विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शरद पवार यांचे नाव राज्यासोबत देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतले जाते. त्यांच्या राजकीय अनुभवाला खूप महत्व आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे.त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही.त्याने फार काही होत नसतं.मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला.त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती.पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली.त्यावेळी काँग्रेसने हात चिन्ह घेतलं.
ते चिन्ह लोकांनी मान्य केलं.तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील.याचा फार परिणाम होत नाही.ही चर्चा एक महिना किवा पंधरा दिवस चालेल.अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी बारामतीमध्ये दिली.