भिगवण : महान्यूज लाईव्ह
अभ्यास करताना मोबाईल पाहत होता म्हणून मुलाला ती रागावली आणि बारावीत शिकणाऱ्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची सुद्धा परवा केली नाही त्यांनी तिचा गळा दाबून खून केला हा धक्कादायक प्रकार उरळीकांचन परिसरात घडला असला तरी यातील मृत महिला ही भिगवण स्टेशनची ग्रामपंचायत सदस्य आहे
तस्लीमा जमीर शेख (वय 37 वर्ष रा. भिगवण स्टेशन तालुका इंदापूर जिल्हा पुणे), सध्या राहणार उरुळी कांचन) असे या मृत आईचे नाव आहे. उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंधरा फेब्रुवारी हा प्रकार घडला.
तस्लीमा शेख या भिगवण स्टेशन ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत. आपल्या मुलाने मोठे व्हावे, कर्तुत्व गाजवावे या आशेने ही माऊली तिच्या पोटाला चिमटा घेऊन उरळीकांचन येथे राहिली. मात्र पोटच्या दिवट्याने तिचाच गळा घोटला.
त्यांच्या मृत्यूने परिसरात धक्का बसला असून पोलिसांनी अगोदर त्यांचा मृतदेह आत्महत्या म्हणून शवविच्छेदनासाठी पाठवला होता. परंतु तेथील डॉक्टरांना संशय आला आणि त्यामुळे या महिलेचे शिवविच्छेदन तीन तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आले. त्यामध्ये डोक्याला जखम होऊन आणि गळा दाबल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ही घटना उघड झाली आणि पोलिसांना देखील धक्का बसला. या महिलेचा संशयित मुलगा जिशान याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून फौजदार अमोल घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली.
या महिलेचा मुलगा हा बारावीत शिकत होता. आईने गळफास घेतल्याचे त्यांनी वडिलांना सांगितल्यामुळे वडिलांनी देखील पोलिसांना हीच माहिती दिली. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पोलिसांना कोणी माहिती दिली नाही, परंतु जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली. तेव्हा घटनेच्या वेळी तसलीमा शेख यांचे पती जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. धाकटी मुलगी घरात नव्हती आणि फक्त मुलगा दिशान हाच घरात होता हे पोलिसांच्या लक्षात आले.
तेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केला केली असता हा प्रकार समोर आला . जिशान हा अभ्यास करत असताना मोबाईलवर पाहत बसल्याने, आई तसलीमा यांनी त्याला रागावून गालावर चापट मारली. त्यावेळी त्याने आईला जोरात भिंतीवर ढकलून तिचा गळा दाबला.
आई निपचित पडल्याने तो घाबरला, परंतु त्याने तिचे मनगट ब्लेडने कापले, मात्र तसलीमा यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाल्याने त्यातून रक्त आले नाही, मग त्याने एक वायर पंख्याला अडकवली आणि खाली आईचा मृतदेह ठेवला. आईने गळफास घेतल्याचे वडिलांना सांगितले. मात्र प्रत्यक्षात प्रकार वेगळाच घडला होता.