राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : काही वर्षांपूर्वी दुधाच्या भेसळी प्रकरणी पाटस येथील एल.व्ही. डेअरी फर्मवर गुन्हा दाखल झाला होता. आता एल व्ही डेअरीच्या नावाखाली कर्ज प्रकरण घेतल्यानंतर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरले म्हणून कोटक महिंद्रा बँकेने दोशी कुटुंबावर तब्बल 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
यवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दुष्यंतसिंह देवेंद्रसिंह झाला या कोटक महिंद्रा कंपनीच्या येरवडा शाखेच्या मुख्याधिकाऱ्यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून यवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात महेश लक्ष्मणदास दोशी, मनाली मंगेश दोशी व मिलिंद लक्ष्मणदास जोशी (सर्व रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोशी कुटुंबाने संगनमत व कट कारस्थान करून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता बँकेस खोटी माहिती व बनावट कागदपत्रे तयार करून दिली व त्यामुळे कोटक महिंद्रा बँक पुणे शाखेचे एकूण 18 कोटी 46, लाख 2 हजार 387 रुपये एल व्ही डेअरी पाटस फर्मच्या व्यवसायासाठी न वापरता भागीदारांनी सदरच्या रकमेची फसवणूक केली.
त्यामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या फिर्यादीनुसार वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्याचे फौजदार श्री नागरगोजे पुढील तपास करत आहेत.