विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आमदार रोहित पवार यांनी आज बारामती मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस काल असं म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मी फक्त अर्धच बोललोय, पूर्ण सत्य बोललो नाही, पूर्ण सत्य ज्या वेळेस बोलेल, त्यावेळेस आपल्याला कळेल.
यावर बोलताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस अर्धच बोलले, पण अर्ध वर्ष झाल्यानंतर बोलले. हेच ते सुरुवातीला बोलले असते, तर लोकांनी कदाचित अर्धा तरी विश्वास ठेवला असता. आज एमएलसी इलेक्शन असेल, पोटनिवडणुका असतील, त्याच्यामध्ये पराजय बीजेपीला आणि शिंदे गटाला खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी येतंय.
त्या वक्तव्याला लोक सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे अस म्हणत आहेत. त्यामुळे हे जे वक्तव्य खरं नाही, अस आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. पण हे आता येतंय, त्यामुळे सहानुभूती घेण्याचा तो एक प्रयत्न आहे असं सामान्य लोकांना वाटायला लागलेलं आहे.
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने ताकद लावताना दिसत आहेत. याबाबत प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले ताकद लावण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय. लोकांची सहानुभूती ही जगताप कुटुंबीयाला नक्कीच आहे. पण याचा अर्थ ते भाजपला मतदान करतील असं नाही.
लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी ज्या आहेत, त्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेली. पण लोक सहानुभूती व्यक्तिगत लेवलला जगताप कुटुंबाबरोबर असली तरी इलेक्शनच्या काळामध्ये भाजपचा विरोध त्या ठिकाणी असणारी जनता करते. आणि येत्या काळामध्ये तो फरक आपल्याला मताच्या माध्यमातून नक्कीच इलेक्शन होईल तेव्हा कळेल. आणि कसब्यामध्ये जे समीकरण भाजपने पुढे आणलेल आहे. तिथल्याच मतदारांना ते योग्य वाटत नाही. पटलेलं नाही. त्यामुळे लोकच तिथं निर्णय भाजपच्या विरोधात घेताना आपल्याला सर्वांना बघायला मिळेल असे रोहित पवार म्हणाले.