ठाणे – महान्यूज लाईव्ह
ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही जणांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यानंतर ऋता आव्हाड आणि जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड याही वर्तक पोलिस ठाण्यात पोचल्या, सहायक आयुक्त महेश आहेर यानी कथित ऑडिओ क्लिपद्वारे आमच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगत त्यांनी तक्रार दिली.
दरम्यान सहायक आयुक्ताला मारहाण केली, त्यामध्ये आव्हाड समर्थकांकडे कोणतीही शस्त्रे नाहीत, उलट रिव्हॉल्व्हर कोणाचे आहे, जे व्हिडीओमध्ये दिसते, ते नीट पहा असेही ऋता आव्हाड यांनी सांगत पोलिसांवर निशाणा साधला.
दरम्यान आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आव्हाड यांच्या दोन-तीन कार्यकर्त्यांनी आहेर यांना कार्यालयाबाहेर मारहाण केली. यावेळी आहेर यांच्या अंगरक्षकाने पिस्तूल रोखल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून त्यांना गोळ्या घालण्याचे आव्हान आव्हाड यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ऋता आव्हाड यांनीही वर्तक पोलिस ठाणे गाठले व तेथे आहेर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. अधिकारी जर अशा प्रकारे वागत असेल तर त्याविरोधात पोलिस काय करताहेत हे आम्ही पाहू, आमच्याकडे पुरावे आहेत, ते पोलिसांकडे दिले आहेत, पोलिसांकडून आम्हाला कारवाईची अपेक्षा आहे. हा अधिकारी कसे वागतो हे सर्वांना माहिती आहे, त्याचा बॉस कोण आहे हेही अनेकांना माहिती आहे, पाहूयात पुढे काय होते ते, नाहीतर आम्ही कोर्टात जाऊच असे ऋता म्हणाल्या.