पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात आज आयकर विभागाकडून सहा ठिकाणी छापेमारी झाली आहे. अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी समजले जातात.
काही महिन्यांपूर्वी अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने आज सकाळी ही छापेमारी झाली आहे.
आयकर विभागाकडून चौकशी सुरू असून या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजलेली नाही. सिटी कार्पोरेशन व ऍमेनोराशी अनिरुद्ध देशपांडे संलग्न आहेत.