मुंबई – महान्यूज लाईव्ह
बीबीसीच्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाने आज एकाचवेळी छापेमारी केली असून येथील कागदपत्रांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी पोचले असून या अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत एकत्र बसवून ठेवले असून आयकर विभाागाचे अधिकारी हे कार्यालयातील कागदपत्रे तपासत आहेत.
दरम्यान यासंदर्भात अद्याप सरकारी सूत्रांनी दुजोरा दिलेला नाही, मात्र बीबीसीच्या अकाऊंट विभागातील महत्वाच्या व्यक्तींचे मोबाईल व लॅपटॉप, डाटा जप्त करण्यात आला आहे.
बीबीसीची डॉक्युमेंट्री कारणीभूत?
मध्यंतरी बीबीसीने गुजरात दंगलीसंदर्भात एक लघुकथा प्रसिध्द केली होती. त्या लघुकथेवर सरकारने भारतात बंदी घातली, मात्र त्यानंतरही ही डॉक्युमेंट्री विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये दाखवली गेल्याने बराच गदारोळ उठला आहे.