बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावानजिकची ही घटना असून २५ वर्षीय गतीमंद युवतीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवराज पोपट खरात (रा. कांबळेश्वर, ता. बारामती) यास अटक केली.
पिडीत तरुणी ही गतीमंद असून ती तिच्या आईकडे पोटात दुखत असल्याची तक्रार करीत असल्याने तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले, तेव्हा ती गर्भवती असल्याचे व तब्बल १९ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
तेव्हा तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने यासंदर्भातील माहिती दिली. ती तिच्या घराशेजारी खेळत असताना शिवराज खरात याने तिला हाताला धरून घरात नेऊन तिची इच्छा नसताना तिच्यावर बलात्कार केला. तीन वेळा त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पिडीतेने दिली.
या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून गतीमंद तरुणीच्या आईने यासंदर्भात माळेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत.