सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील टण्णू गावात एका शेतात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली असून या घटने्ने परिसरात खळबळ उडाली आहे, दरम्यान याची शहानिशा करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील टण्णू येथील चव्हाणवस्ती येथे ही वस्तू आढळली असून निळ्या रंगातील ही वस्तू चेंडूसारखी व त्याच्या वरच्या बाजूला तोंड असून त्यामध्ये भरलेला पदार्थ दारूगोळ्याचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून पथकाकडून याची शहानिशा केली जात आहे. दुसरीकडे येथे बॉम्ब कसा काय आढळला याचीच चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे.