राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
वंचित,उपेक्षित बहुजन घटकांचा बुलंद आवाज वृत्तरत्न दैनिक सम्राटचे संपादक कालकथित बबनराव कांबळे याचे नुकतेच निधन झाले. दौंड येथील विविध पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
रविवारी (दि.१२ ) दैनिक सम्राटचे संपादक,लेखक, विचारवंत बबनराव कांबळे यांचे नुकतेच निधन झाले. कांबळे यांनी आपल्या लेखणीतून दैनिक सम्राट माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. बबनराव कांबळे यांनी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या उद्देशाने बबनराव कांबळे यांनी दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सन २००३ ला सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून बबनराव कांबळे यांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्रातील दलित बहुजनांना न्याय मिळवून देणाचा प्रामाणिक प्रयत्न.हे करताना कोणत्याही राजकीय दबाव व अमिषाला बळी न पडता निर्भिडपणे लेखन केले. तसेच फुले शाहू आंबेडकर यांचे विचारधारा, ऐतिहासिक कार्य लेख स्वरूपात ग्रामीण भागात घराघरात पोहोचण्याचे काम केले.
या २३ वर्षाच्या कालावधीत दैनिक सम्राट हा बहुजनांच्या हृदयात घर करून बसला होता. मात्र दैनिक सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यांची ही दुखद बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरताच पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान,दौंड येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या शोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती विकास कदम, जेष्ठ दलित नेते आबासाहेब वाघमारे, दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी विजय चव्हाण, नागसेन धेंडे, भारत सरोदे,ऑल इंडिया पॅंथर सेनेचेचे सागर उबाळे , पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे यादव जाधव ,प्राध्यापक भीमराव मोरे, नरेश डाळिंबे, पवन साळवे, रमेश चावरिया, भिमराव मोरे आदींनी कांबळे यांच्या वृत्तलेखनाचे कौतुक करीत बहुजनांसाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ हातात घेऊन लढणारा एक सम्राट हरपल्याची भावना यावेळी व्यक्त केली. बबनराव कांबळे हे जरी आपल्यातून गेले असले तरी त्याने केलेले काम डोळ्यासमोर ठेवून त्यांचे काम पुढे नेण्याची आवश्यकता असुन त्यासाठी गटतट, मतभेद विसरून एकत्र येण्याचे आव्हान या शोकसभेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमित सोनवणे, विनायक माने, अक्षय शिखरे, सुशांत वाघमारे, मुकेश जानराव, प्रमोद गणेश रजपुत , किशोर पाटोळे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ नेते आबासाहेब वाघमारे यांनी या शोकसभेचे आयोजन केले तर उपस्थितांचे आभार महान्युजचे दौंड तालुका प्रमुख राजेंद्र झेंडे यांनी मानले.