दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सुरुर गावच्या हद्दीतील महामार्गावर असणारे हॉटेल साई पार्क इन या हॉटेल मध्ये चहानाष्टा करण्या साठी प्रतिक कृष्णा कंबळकर हे आले होते. चहा,नाष्टा उरकून ते घाईगडबडीने गेले होते. सोबत १० तोळ्याची असलेली दागिन्यांची बॅग ते हॉटेल मध्येच विसरून गेले.हे हॉटेल मालक सुधीर यादव (रा. गुळुंब ता वाई) यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बॅग ताब्यात घेतली
त्यांनी तात्काळ याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांना कळवली. त्यानंतर यादव व श्री. गर्जे यांनी बॅग मालकाचा शोध घेतला. त्यांना भुईंज पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आणि त्यांची विसरलेली बॅग १० तोळे सोन्याचे दागिने असलेली दागिन्यांची पिशवी सहायक निरीक्षक रमेश गर्जे, हॉटेल मालक सुधीर यादव या दोघांनी प्रतिक कंबळकर यांच्याकडे सुपूर्त केली.
या वेळी कंबळकर यांनी श्री. गर्जे व हॉटेल मालक सुधीर यादव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले. यावेळी फौजदार रत्नदीप भंडारे, दप्तरी विकास गंगावणे, सुनील पोळ, सचिन नलवडे, डी. एन. गायकवाड, अनवडीचे पोलिस पाटील दिपक गिरी, धोमचे पोलिस पाटील अरविंद चव्हाण उपस्थित होते .