सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे येथील कसबा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड येथील मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या मैदानात कार्यरत राहणार आहेत.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने अनुक्रमे कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील नुकतीच पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे स्टार प्रचारक म्हणून पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन निवडून जिंकण्याच्या संपूर्ण तयारीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे.
या दोन्ही मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते प्रचारात नाही सक्रिय होतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे डबल इंजिन सरकार असून विकासाची घोडदौड अशीच पुढे चालू राहण्यासाठी या मतदारसंघातील मतदारांना भाजपच्या पाठीशी ठाम राहण्यासाठी ते आवाहन करणार असून त्यासाठीची बांधणी देखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.