किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भवानीनगर ता. इंदापूर येथील विद्यार्थी जयदीप नितीन काटकर याने अहमदनगर येथे पार पडलेल्या शालेय विभाग स्तरावरील क्रिडा स्पर्धेत 19 वर्षा खालील वयोगटांमध्ये सायकलिंग स्पर्धेमध्ये मास स्टार्ट प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच काटे ओम अभिजीत याने विभाग स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक मिळवला.
त्याबद्दल श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, सचिव अशोक मोरे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश मचाले, सर्व प्राध्यापक यांनी दोघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या दोघांनाही कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्राध्यापक लोंढे पी के, बनसोडे डी बी , माने सी टी व पवार व्ही आर यांनी मार्गदर्शन केले त्यांना बिरू भोजने यांनी सायकलिंग चे विशेष मार्गदर्शन केले.