बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील जाळोची येथील एचडीएफसी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सीबीआय कोर्टाने सुनावली आहे. बारामती येथील एचडीएफसी बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर नितीन निकम आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह गणेश धायगुडे अशी शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
ही घटा सन 2020 मध्ये घडली होती. निकम आणि धायगुडे यांनी कर्जदाराला 99 लाखाचे कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदाराला दोन लाख 70 हजारांची लाच मागितली होती.
वाटाघाटीनंतर सव्वादोन लाखांची रक्कम देण्यावर तडजोड झाली. ९९ लाख रुपये कर्ज मंजूर करून देत असल्याने ही लाचेची रक्कम मागितली गेली होती. मात्र कर्जदाराने सीबीआयची मदत घेतली. सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सीबीआयने सापळा रचला.
नितीन कदम याने ही लाच स्विकारण्यासाठी गणेश धायगुडेला पाठवले. मग 2 लाख रक्कम देताना सीबीआयने गणेश धायगुडेला रंगेहाथ पकडले. कर्जदाराकडन लाज घेण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर नितीन निकम गणेश धायगुडेला सांगितलं होतं अस तपासात उघड झाले.
18 डिसेंबर 2020 या प्रकरणी आरोपपत्र पुणे येथील कोर्टात करण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल 2023 मध्ये लागला आहे. सीबीआय कोर्टाने नितीन निकम यांना 60 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाची शिक्षा तर गणेश धायगुडेला 10 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाचा कारावास सुनावला आहे.