शिरूर – महान्यूज लाईव्ह
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरोना काळातही मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विस्तार अधिकारी जयवंत भगत यांना ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार जयवंत भगत यांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृषी अधिकारी जयवंत भगत हे निर्वी धुमाळवाडी चिंचणी गुनाट शिंदोडी येथे अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी सातत्याने चर्चासत्र बैठका तसेच प्रत्यक्ष शेतावर बांधावर जाऊन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार केला आहे.
अतिरिक्त पदभार असतानाही केल्याने तसेच कृषी विभागाकडुन प्राप्त लक्षांक पुर्तताही केली असून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा फायदा झालेला अनेक गावात दिसून येत आहे. युवक शेतकऱ्यांना शेतीची आवड निर्माण करणे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोच्छाहित करणे आणि उत्पादन वाढविणे हे त्यांचे लक्ष असून या कामी शेतकरी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे दिसुन येत आहे.
भगत यांना तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे, कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे, मंडळ कृषी अधिकारी रोहीणी गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच महादेव गदादे सह तालुक्यातील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक सहकार्य करून प्रोत्साहन देत आहेत.
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देताना, योजनाचा प्रचार प्रसार करताना शेतकऱ्यांच्या सोईनुसार ते वेळ देत असुन कोरोना काळातही त्यांचे हे कार्य सुरू ठेवले होते.
या सत्कारप्रसंगी निर्वी येथील उपसरपंच निलेश सोनवणे, मेजर विजय रोडे, संजय काटे, उपसरपंच शरद पवार, दत्तात्रय सोनवणे, प्रफुल्ल सोनवणे, संतोष काळे, अशोक गाजरे, मच्छिंद्र भुजबळ, अनिल दंडवते, अनिल जगताप, योगेश गाडे, विठ्ठल भगत, दत्तात्रय भगत, गितांजली भगत आदी उपस्थित होते.