विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
राज्यभरात वेगवेगळे हिंदूत्ववादी कायदे करण्यासाठी सरकारविरोधात हिंदूत्ववादी संघटनांचा मोर्चा सुरू आहे. याअंतर्गत हिंदूत्ववादी संघटनांनी राज्यभरात लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधात कायदे करण्यासाठी हिंदू जनजागरण मोर्चे सुरू केले आहेत.
बारामतीत आज (ता. ९) मोर्चा होणार आहे. त्यासाठी बारामती शहरात विविध ठिकाणी भगव्या झेंड्यांनी वातावरण भगवे करून टाकले आहे. ही जनगर्जना छत्रपती शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठीच सुरू असल्याचा दावा कालिचरण महाराज यांनी केला आहे.
या मोर्चासाठी कालिचरण महाराज, शरद गायकर उपस्थित राहणार असून दुपारी एक वाजता हा मोर्चा कसबा येथून सुरू होणार आहे, तर शहरातील तीन हत्ती चौकात जाहीर सभा होणार आहे. या मोर्चासाठी गेल्या काही दिवसांपासून सकल हिंदू समाजाच्या वतीने जनजागृती व प्रचारमोहिम सुरू आहे.