अक्कलकोट : महान्यूज लाईव्ह
दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा चा कारभार पाहत आहेत. अक्कलकोट पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या या दबंग स्टाईल कारवाईमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची अवघ्या सहा महिन्याच्या आत तडकाफडकी बदली करण्यात आली होती. राजकीय दबावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा दौंड शहरासह तालुक्यात होती. घुगे यांची दौंड पोलीस स्टेशन बदली झाल्यानंतर त्यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारताच घुगे यांनी अक्कलकोट शहरातील अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करीत लगाम लावला आहे. तसेच रस्त्यावर असलेल्या वाकडी तिकडी व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बेशिस्त वाहनांवर कारवाई केली आहे. रस्त्यावर लावलेले दुकानाचे फलक तसेच दुकानासमोर लावलेले दुकानदारांचे साहित्य, दुकानासमोर वास्तव्यस्त लावलेली वाहने, फळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, फेरीवाले यांचेवर योग्य ती कारवाई करीत शिस्त लावली आहे.
बस स्टँड, कारंजा चौक, विजय कामगार चौक, बागवान मस्जिद, सेंट्रल चौक, तूप चौक, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, युनियन बँक परिसर पायी पेट्रोलिंग करून दुकानदार यांना दुकानासमोरील अतिक्रमण काढून कोणीही अस्ताव्यस्त वाहने लावणार नाहीत, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना पोलीस निरीक्षक घुगे यांनी केल्याने आणि कारवाईच्या भीतीने दुकानदारांनी अंमलबजावणी केली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता पोलीस निरीक्षक घुगे यांनी घेत ठोस अशी कारवाई होत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही शहरातील बेशिस्त वाहनांसह बेकायदा वाळू उपसा, दारू, जुगार, मटका यावर मोठी कारवाई केली होती. मात्र त्यांची राजकीय दबाव बदली करण्यात आली होती.