विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्यानंतर बारामतीच्या शेतीविषयक सुधारणा व शेतीविषयक तंत्रज्ञान प्रसाराच्या मोहिमेची भुरळ राज्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही पडली आहे. आज ते बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला सकाळपासून भेट देत आहेत.
सुधीर मुनगुंटीवार हे आज सकाळी नऊ वाजता बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्स्टच्या डेअरी ऑफ एक्सलंन्स या देशी गोवंश सुधार प्रकल्पाला भेट देऊन नंतर अटल इन्क्युबेशन सेंटर व डॉ. अप्पासाहेब पवार रिसर्च इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
त्यानंतर ते कृषी विज्ञान केंद्राची व तेथील कृषी प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. यानंतर कृषी विज्ञान केंद्रामार्फत होत असलेल्या विविध तंत्रज्ञान प्रसाराची माहिती घेऊन महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या विज्ञान पार्कला भेट देतील.