दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे बारामतीच्या युवकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता आज तालुक्यातील वरवंड येथे एका ज्येष्ठ नागरिकाची तीक्ष्ण हत्याराने वार करीत निघृण खून केल्याची घटना घडली आहे.
हुसेन अल्लीसो तांबोळी (वय ६०, वरवंड पुनवर्सन ता दौंड जि. पुणे) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून मंगळवारी (दिनांक ७) पहाटे चार पाच वाजण्याच्या आसपास रहात्या घरी दारासमोर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्नन लोखंडे आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, हुसेन तांबोळी हे पत्नी सोबत दोघेच घरी रहातात. मात्र आज पहाटे लोकवस्तीत असलेल्या रहात्या घरी दारासमोर अज्ञात व्यक्तींनी त्यांची निघृण खून केल्याची घटना घडली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली आहे, याबाबत यवत पोलीस या घटनेचा तपास करीत असून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.