संदिप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांच्या लोणार तालुका महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी होऊन आमदार झाल्यानंतर प्रथमच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी लोणार तालुकातील विकास आघाडीच्या वतीने धीरज लिंगाडे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सतीश महेंद्र, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, ओबीसी सेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप मापारी, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे आदी उपस्थित होते.