बारामती : महान्यूज लाईव्ह
24 तास आम्ही फक्त जनतेचे काम करतो अशी बतावणी करणाऱ्या शिंदे सरकारचे पितळ उघडे पाडणारा एक माहिती अधिकाराचा धक्कादायक अहवाल बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हाती लागला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासुन फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतुन तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती नितीन यादव यांना माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.
नितीन यादव यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती ही माहिती नुकतीच त्यांना मिळाली असून यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
नितीन यादव, सोमेश्वरनगर, बारामती : सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडुन खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का?