इंदापूर : महान्यूज लाईव्ह
समाजातील वास्तव चित्र समोर मांडत असताना दैनंदिन जीवनात वृत्त संकलनासाठी होणाऱ्या धावपळीमुळे पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी अकलूजच्या धर्तीवर इंदापूरातही त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात यावीत, अशी अपेक्षा अकलूज येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एम.के. इनामदार यांनी व्यक्त केले.
इंदापुरात पत्रकारांचा सन्मान सोहळा व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सुंदरबाई शिंदे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. इंदापूर तालुका भारतीय जनता पक्ष, क्रांतिज्योती विचारमंच, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात ‘महान्यूज’ चे सर्वेसर्वा सुरेश मिसाळ यांना निर्भिड पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. इनामदार म्हणाले की,पत्रकार दिनाला अकलूज येथे आपण पत्रकारांची आरोग्य तपासणी करतो. त्यांचे नातेवाईक आरोग्याबाबत आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांना मदत करणे कर्तव्य समजूनच मी ते पार पाडतो. इंदापूरात ही तसे नियोजन व्हावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजपचे तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व क्रांतीज्योती विचारमंचाचे प्रमुख पांडुरंग शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, सलीम शेख, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी निवड झालेल्या मोहिनी भागवत यांची या वेळी भाषणे झाली. पत्रकार महेश स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.
माजी नगराध्यक्षा नलिनी शिंदे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माऊली चवरे,जयवंत नायकुडे,सुनील सोनवणे व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. भाजपचे तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व क्रांतीज्योती विचारमंचाचे प्रमुख पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोष शिंदे, आदित्य बोराटे व त्यांच्या सहका-यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ————————————————————-
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर ( वालचंदनगर), दिवाणराव देवकर(लोणी देवकर), डॉ.संदेश शहा (इंदापूर) व मनोहर चांदणे (निमगाव केतकी) यांना सावित्रीबाई फुले समाजगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ काळ केलेल्या कार्याबद्दल सलीम शेख यांना सेवा ज्येष्ठता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
२० वर्षांहून अधिक काळ निर्भीड पत्रकारिता करत वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे पत्रकार सुरेश मिसाळ ( महान्यूज लाईव्ह; डिजिटल मिडिया), तानाजी काळे (दै.लोकसत्ता), शैलेश काटे (लोकमत), महेश स्वामी (पुण्यनगरी), सुरेश जकाते (केसरी,तरुण भारत), उमाकांत तोरणे (संपादक निर्भय भारत), निवृत्ती भोंग (मुव्हमेंट एक्सप्रेस न्युज), धनंजय थोरात (पुढारी), धनंजय कळमकर- (संपादक शिवसृष्टी), राहुल ढवळे (आर डी महाराष्ट्र यूट्युब चॅनल) यांना सन्मानित करण्यात आले. सिध्दार्थ मखरे (दै.नवराष्ट्र) यास युवा पुरस्कार देण्यात आला. डॉ.एम.के.इनामदार व न्यायाधीश मोहिनी भागवत यांना ही सुंदरबाई शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.