दिल्ली : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने चीनवर डिजिटल अटॅक करत तब्बल 200 मोबाईल ॲप्स वर बंदी घातली आहे. यामध्ये ऑनलाईन लोनच्या ॲप्स सर्वाधिक समावेश आहे.
मध्यंतरी केंद्र सरकारने बहुतांश मोबाईल ॲप वर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॅक सह इतर बऱ्याच मोबाईल ॲपचा समावेश होता. मात्र त्यानंतरही ऑनलाईन लोन च्या नावाखाली सुरू केलेले ॲप्स हे अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले होते आणि त्यातून अनेकांचा छळ झाल्याची उदाहरणे समोर आली होती.
त्यामुळे अशा ॲप्स वर बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्यांमधूनही उमटत होती. अखेर गृहमंत्रालयाने हे ॲप्स ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या सामन्यांवरील बेटिंग लावणारे आणि ऑनलाईन लोनचे ॲप समाविष्ट आहेत. या ॲपचा समावेश भारतामध्ये हेरगिरी करण्यासाठी ही केला जाऊ शकतो अशी शंका व्यक्त करून ई स्टोअरवर वरील चिनी कर्ज देणाऱ्या 94 मोबाईल ॲप्स वर बंदी घातली आहे.
दरम्यान माहिती प्रसारण मंत्रालयाने देखील नव्याने एक प्रसारण जारी करून अशा मोबाईल ॲप्सवर जाहिराती देऊ नयेत अशी सूचना केली आहे. गृहमंत्रालयानेही इमर्जन्सी ब्लॉक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता कारवाई सुरू केली आहे.