विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : तालुक्याने मला ३२ वर्ष निवडून दिलय. त्यामुळे कुठलाही विचार करताना शरद पवारसाहेब सांगतात, पुढची २५ ते ५० वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा असतो. त्या अँगलने तो निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्यालाही काही दिवसांनी काम पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे टू व्हीलर,थ्री व्हीलर,फोर व्हीलर, हेवी व्हेईकल यांना त्रास होणार नाही. चालणार्या व्यक्तींना त्रास होणार नाही अशा प्रकारची खबरदारी निश्चितपणे घेतली जाईल असं अजित पवार म्हणाले.
आपल्या बारामतीतला तो पूल किंवा तिथून खालून जे पाणी वाहतं तो ब्रिटिशांच्या काळामध्ये कालवा झाला आहे, त्यातून फक्त चारशे ते साडेचारशे क्युसेक्स पाणी वाहते. पुढचा विचार करता ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये चार महिने वीरचे पाणी आपण नीरा नरसिंगपूरमार्फत चंद्रभागेला सोडतो आणि चंद्रभागेतून कर्नाटकात जाते.
त्याऐवजी निरा डावा आणि उजवा कालवा फुल कॅपॅसिटीने चालून जर त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे तलाव भरले आणि वेगवेगळ्या प्रकारे पर्क्युलेशन होण्याकरता त्या पाण्याचा वापर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याकरिता पाण्याचा वापर केला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून लॉंग टर्मचा विचार करून त्यांनी आत्ता एक हजार क्यूसेक पाणी त्याच्यातून पास होईल आणि त्याच्यातून पाणी पास होत असताना जर पाण्यामध्ये काही वाहून आलं तर त्यावेळेस मध्ये गॅप ठेवावा लागतो आज आम्ही तिथे पाहणी केली.
कमीत कमी तेवढी उंची ठेवावीच लागत आहे. तीन पिढ्याच्या अगोदरचा तो कॅनॉल आहे आणि आता आपण उद्याचा तीन-चार पिढ्यांचा विचार करतोय म्हणून फार विचार करून पीडब्ल्यूडी विभाग जलसंपदा विभाग आणि टेक्निकल क्षेत्रामधील मान्यवर अशा सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आहे.