मुंबई : महान्यूज लाईव्ह
आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट स्थितीत पोचली असून श्रीलंकेनंतर पाकिस्तानची परकीय गंगाजळी संपण्याच्या मार्गावर आहे सध्या पाकिस्तानातील रुपयाची किंमत ढासळली असून एका डॉलर मागे पाकिस्तानी रुपया 271 रुपयांवर पोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान अत्यंत विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. आज पाकिस्तान सरकारने सर्व राजकीय पक्षांची एकत्रित राजकीय बैठक बोलावली असून, पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी त्यावर चर्चा होणार आहे.
पाकिस्तानच्या या अवस्थेला पाकिस्तानचे ड्रॅगन कनेक्शन कारणीभूत असल्याचे सांगितले जात असून जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या या घसरत्या अर्थकारणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमधील अन्नधान्याच्या तसेच इतर पदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, पाकिस्तानी नागरिक या बदलत्या परिस्थितीने हैराण झाले आहेत.
पाकिस्तानी रुपयाची स्थिती अत्यंत चिंताजनक परिस्थितीमध्ये असून पाकिस्तानी रुपया जागतिक तुलनेत प्रचंड घसरला आहे आज एका डॉलरची पाकिस्तानी रुपयाची किंमत 271 रुपयांवर पोहोचली आहे.