दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची १९१ व्या शहिद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पाटस येथील आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारकाजवळ समाज बांधवांच्या वतीने उमाजी नाईक यांचा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. राजे उमाजी नाईक यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून त्यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून ब्रिटिश राजवटीविरोधात बंड करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने पुणे येथील मामलेदार कचेरीच्या आवारात त्यांना ३ फेब्रुवारी रोजी फाशी दिली. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उमाजी नाईक यांचे नाव अजरामर झाले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब खोमणे, ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे, माजी सरपंच संभाजी खटके, माजी उपसरपंच संतोष शितकल, शंकर पवार, सुरेश वाबळे, दीपक भागवत, संजय गायकवाड, प्रमोद आखाडे, चंद्रकांत भागवत, बापू भंडलकर, मच्छिंद्र मदने, विठ्ठल माकर, धीरज खोमणे, बाळासाहेब नानवर, जय मल्हार क्रांती संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मीना जाधव, रंजना मदने, मीना गुडगुल, सुरेखा भंडलकर यांच्यासह महिला पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.