सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भारतीय जनता युवा मोर्चा चे कोअर कमिटी प्रमुख तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरच्या राजवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन पाटील मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून राजवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो.
यावेळी कैलास कदम, धनंजय पाटील, शेखर पाटील, डॉ.सुहास शेळके, डॉ.चोरमले, गोरख शिंदे , सागर गानबोटे, मच्छिंद्र शेटे, ललेंद्र शिंदे, अविनाश कोथमीरे, संतोष देवकर ,नितीन मखरे, अशोक खेडकर, सचिन जामदार, संदीप चव्हाण, राहुल जौंजाळ उपस्थित होते.