अहमदाबाद – महान्यूज लाईव्ह
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेंटी-२० स्पर्धेत सर्वाधिक १२६ धावा झळकावणारा शुभमन गिल पहिला भारतीय खेळाडू ठरला असून काल त्याच्या या झुंझार खेळीच्या जिवावर भारताने तब्बल १६३ धावांनी किवींचा धुव्वा उडवला.
शुभमन गिलने द्विशतक झळकावून भारतासह जगभरातील क्रिकेटशौकिनांचे लक्ष वेधून घेतले होते. आता लागलीच टी-२० स्पर्धेतही शतक झळकावून याला झळाळी आणली.
अहमदाबादच्या सामन्यात त्याने केवळ ३५ चेंडूत पहिले अर्धशतक ठोकले आणि त्यानंतर तर केवळ १९ चेंडूतच सेंच्युरी मारली. अवघ्या ६३ चेंडूत त्याने १२६ धावा फटकावल्या.
विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याही विक्रमाला त्याने या शतकाने मागे टाकले. विशेष म्हणजे कसोटी, एकदिवसीय सामना व ट्वेंटी-ट्वेंटी या तीनही प्रकारात शतक झळकावणारे जगातील २० खेळाडू आहेत, त्यामध्ये शुभमनचा समावेश झाला आहे.