मुंबई – महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आनंद परांजपे यांनाही पोलिस कारवाईत अडकवले जाऊ शकते व ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत व त्यानंतरचे काही महिने जेलमध्ये ठेवण्याचा सरकारचा प्लॅन असून दिल्लीतून हे षडयंत्र सुरू आहे असा गौफ्यस्फोट खुद्द आव्हाड यांनीच केला आहे.
दरम्यान आव्हाड यांनी यासंदर्भात काही ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच याची माहिती दिल्याचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाण्यातील नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांना पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अर्थात आव्हाड यांना नेमक्या कोणत्या कारणावरून अटक होऊ शकते याची माहिती मात्र दिलेली नाही. दरम्यान आव्हाड यांच्या गैरहजेरीत आपल्याला निवडणूक लढवावी लागणार असल्याची माहिती नगरसेवकांना दिली असून शिंदे गट अनेक प्रकारची अमिषे दाखवू शकते, त्याला बळी पडू नका असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीच्या बैठकीत करण्यात आले आहे.