सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर उपकोषागार कार्यालयात आज कोषागार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
उपकोषागार अधिकारी सुधीर बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर चे कार्यालय सुसज्ज करण्यात आले होते.स्वच्छतेबरोबरच कार्यालयात विवीध रंगाच्या रांगोळीने कार्यालयाच्या सौंदर्यात भर पडली.
यावेळी उपकोषागार अधिकारी सुधीर बडेकर यांना सर्व मुद्रांक विक्रेते, इंदापूरच्या प्रशासकीय कार्यालयातील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी कोषागार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आज दुपारी श्री.बडेकर व कार्यालयाचे लिपीक शशांक कोरटकर यांना मुद्रांक विक्रेते, पत्रकार सुरेश मिसाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे गृहपाल प्रशांत हेळकर, मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती नसीमा कासीम मुलाणी, कर्मचारी दशरथ कनिचे, सुरेश चव्हाण यांच्यासह सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
शासनाने १ फेब्रुवारी १९६५ पासून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा स्थापन केली.व तेव्हापासून १ फेब्रुवारी हा दिवस ‘ कोषागार दिन’ म्हणून साजरा केला जात असल्याची माहिती इंदापूर चे उपकोषागार अधिकारी सुधीर बडेकर यांनी दिली.