कोल्हाट्याचं पोर’ ची आईचा आजही सुरू आहे जगण्यासाठी संघर्ष! हालअपेष्टा अन् भाडोत्री घरात!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आई आणि ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई काळे यांचा मागील अनेक वर्षांपांसून जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. भाड्याच्या घरात राहून त्या दोन वेळेच्या जेवणासाठी भटकंती करीत आहेत. अशा प्रचंड हाल अपेष्टेत त्या जगण्यासाठी रोज नवा संघर्ष करीत आहेत.

हा संघर्ष त्यांच्यासाठी नवा नाही मात्र एकुलत्या एका तरुण मुलाच्या जाणाने त्या जेवढ्या दुःखी झाल्या नाहीत त्या सरकार दरबारी वारंवार हेलपाटे मारून आणि समाजाकडून होत असलेले दुर्लक्षांमुळे त्या अधिक दुःखी आणि व्यतीत झाल्या आहेत.

‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकाचे लेखक विचारवंत डॉ. किशोर काळे यांचे वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या अपघाती निधनानंतर ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांना जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. त्यांची मदतीसाठी भटकंती सुरूच आहे.

“कुणी घर देता का घर” असा आर्त टाहो ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांनी फोडला आहे. जिल्हाधिकारी, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज – विनंती केल्या. तरीही घर मिळेना, ना राहायला घर ना वेळेवर कलावंतांचे मानधन मिळेना, मदतीसाठी शांताबाई काळे यांची मदतीसाठी वर्षानुवर्षे भटकंती सुरूच आहे.

आजपर्यंत स्वाभिमानाने जगण्याची सवय झाल्याने कोणापुढे हात पसरत नव्हते , कष्टाने आणि संघर्ष करुन मुलाला डॉक्टर बनवले पण तोही मला सोडून निघून गेला, माझा डॉक्टर आज असता तर मला कोणापुढेही हात पसरायची गरज पडली नसती, सध्या माझी फार हाल सुरू आहे, भाडे च्या घरात राहून कसेबसे जगत आहे.

जेष्ठ कलावंतांसाठी शासनाकडून थोडं फार मानधन मिळत होते, मात्र तेही आता मिळत नाही. मागील अनेक वर्षापासून मी जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी हेलपाटे मारत आहे, मात्र चार जिल्हाधिकारी बदलले, मात्र माझ्या अर्जाचा विचार केला गेला नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माझी हाल अपेष्टा चालू आहे,हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण शासनाकडून दुर्लक्ष तर होतेच मात्र समाजाकडूनही दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी आमदार बच्चू कडू यांनी थोडीफार आर्थिक मदत केली होती. मात्र मुख्यमंत्री यांनी मदत करावी, भाड्याच्या घरात नव्हे, तर स्वतःच्या मालकीच्या घरात मला मरण यावे अशी अपेक्षा शांताबाई काळे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कोल्हाटी या समाजातुन आलेल्या शांताबाई काळे यांनी तमाशा सारख्या लोककलेतून गावोगावी जाऊन आपल्या कलेतून प्रबोधन व मनोरंजन केले. पतीच्या निधनानंतर ही त्यांनी आपल्या मुलगा किशोर याला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनवले, पुढे याच मुलाने शाळेत वडिलांच्या ऐवजी किशोर शांताबाई काळे हे नाव लिहीलं आणि आईचं स्वप्न डॉक्टर बनवून पूर्ण केले.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श म्हणून डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मात्र त्यांचे डॉक्टरची सेवा करताना अपघाती निधन झाले. ‘कोल्हाट्याचं पोर’ हे त्यांचे आत्मचरित्र पुस्तकाने नवा विक्रम केला होता. मात्र समाजातील दानशूर व्यक्तींनी ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांच्या मदतीसाठी शासनाच्या मदतची वाट न बघता पुढे येण्याची आवश्यकता आहे.

Maha News Live

Recent Posts