मुंबई : महान्यूज लाईव्ह
बलात्काराच्या आरोपाखाली बलात्कारी स्वयंघोषित संत आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने काल दोषी ठरल्यानंतर आज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यानंतर देशभरातील या स्वयंघोषित बापूच्या अंधभक्तांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, सूरतमधील दोन तरुणीवर केलेल्या बलात्कार प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आधीच तुरुंगवास भोगत असलेल्या आसारामचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. आज सुनावण्यात आलेली शिक्षा आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहता आता आसाराम लवकर तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता फारच कमी आहे.
नारायण साईला सुद्धा लवकर दिलासा मिळणार नाही. या दोघांशिवाय आसामरामचं धार्मिक सम्राज्यचं कामकाज सामान्यपणे सुरु आहे. आसारामच्या भक्तांच्या संख्येत आणि दान म्हणून मिळणाऱ्या पैशांची आकडेवारी कमी झाली असली तरी त्याच्या भक्तांच्या दाव्यानुसार जाणूनबुजून त्याला अडकवण्यात आलं आहे.
अर्थात आसाराम तुरुंगामध्ये असतानाही त्याच्या आश्रमाचे कामकाज अद्यापही सुरळीतपणे सुरु आहे. आहाराचे देशात 400 हून अधिक आश्रम, दिड हजार सेवा समित्या, 17 हजार बाल संस्कार केंद्र, 40 गुरुकुल असा सारा पसारा आसारामच्या सम्राज्याचा भाग आहे.