दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा पुणे महामार्गावरील वेळे (ता,वाई) गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्याच्या अलीकडे इनोव्हा कार थेट डोंगराच्या दगडाला धडकून इनोवा कारमधील माय लेकींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत इतरही तीन जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात इनोवा कार रस्त्याकडेला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दगडावर आदळून ती अंदाजे ५० फुट कार फरफटत गेली. कार पलटी झाल्याने त्यात पत्नी सौ. रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय ५२ ) व कांतीकाबाई वाल्मिक जाधव (वय ७०) या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान या ठिकाणी दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी सहकारी फौजदार रत्नदिप भंडारे, सहाय्यक फौजदार किर्दक, शिवाजी तोडरमल, रविराज वर्णेकर या सर्वांना घेऊन तातडीने अपघात स्थळावर भेट दिली.
रुग्णवाहिका मागवून अपघातातील जखमींना कार मधून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खंडाळा आणी शिरवळ येथे दाखल केले असता, तेथील उपस्थित डॉक्टरांनी सौ. रंजना व त्यांची आई कांतीकाबाई या मायलेकींना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.
ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (वय ६०) पत्नी रंजना, मोठा मुलगा प्रशांत, लहान मुलगा प्रतीक त्याची पत्नी सौ.नेहा, नात इशा, मुलगी पुजा शशिकांत जाधव, सासु कांतीकाबाई वाल्मिकी जाधव, मित्र काशीनाथ रेवनशिध्दाप्पा वारद असे सर्वजण
२८ डिसेंबर रोजी पहाटे पुणे ते गोकर्ण येथे फिरण्यासाठी गेले होते. ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथील आपल्या घराकडे जात असताना त्यांची कार पहाटे ५. ४५ वाजण्याच्या सुमारास वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्याच्या अलीकडे आली असता त्या वेळी चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली इनोवा कार रस्त्याकडेला असणाऱ्या दगडावर आदळली.