पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ग्रामीण शाखेंतर्गत आंबी गावात वाळू माफियावर सर्वात मोठी कारवाई
सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
सुपे : कालपासून बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्याचा सगळा परिसर जप्त केलेल्या वाहनांनी भरून गेला आहे. कारण चक्क स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने थेट छापा टाकत वाळू माफियांना पकडले आहे. त्यांची अनेक वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या आवारात आहेत.
बारामती तालुक्यातील अनेक वर्षापासून निर्ढावलेल्या मोरगाव -आंबी कऱ्हा नदीपात्रात होणाऱ्या बेसुमार वाळू माफीयावर रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मी मोठी कारवाई केली.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार शामराव चांदगुडे (वय 46 वर्षे रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे), 2) स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय 27 वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे), 3) विठठल तानाजी जाधव (वय 25 वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे), 4) अमोल शंकर सणस (वय 46 वर्षे रा. उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे), 5) महादेव बाळु ढोले (वय 38 वर्षे रा. मोरगाव ता.बारामती जि.पुणे) आणि 6) विकास बाबासो चांदगुडे 35 वर्षे (रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे) अशी या कारवाईत सापडलेल्या इसमांची नामे असून अजून तीन अनोळखी इसम याठिकाणी छापा पडताच ठिकाणावरुन पोबारा करून गेले.
रविवारी पहाटे 03/35 चे सुमारास चांदगुडेवाडी गावचे हददीत धरणवस्ती येथे क-हा नदीपात्रात हे सर्व जण वाळू उत्खनन करून वाहने भरत असल्याचे निर्दशनास आले. यावेळी अनेक वाहने हस्तगत करण्यात आली. यामध्ये एक पिवळे रंगाचे जेसीबी कंपनीचे थ्रीडीएक्स मॉडेलचा मशीन नं. एम.एच.42 ए.9283, हिरवे रंगाचा जॉनडिअर कंपनीचा टॅक्टर नं. एम.एच.42 वाय 7801, त्यास जोडलेली लाल रंगाची डंपीग ट्रॉली नंबर नसलेली, त्यामध्ये 1 ब्रास वाळु भरलेली होती
याखेरीज निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर, निळ्या रंगाची डंपींग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली, लाल रंगाचा महींन्द्रा कंपनीचा टॅक्टर नं. एम.एच 13 जे 8096, लाल रंगाची डंपीग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली तसेच हिरव्या रंगाचा जॉनडिअर कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम.42जे.एस.4762, त्यास लाल रंगाची डंपीग ट्रॉली त्यामध्ये 1ब्रास वाळु भरलेली होती.
एक पिवळे रंगाचे जेसीबी मशीन थ्रीडीएक्स मॉडेलचे जेसीबी मशीन नं एम.एच.09सी.एल 211तसेच लाल रंगाचा टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा ओपन बॉडी ट्रक नं. एम.एच.12एच.डी.7811त्यामध्ये 5ब्रास वाळु असे सर्व 47 लाख 70 हजार रुपये किंमतीची वाहने ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आलेले आहेत.