दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील कै. एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयातील बी.सी.एस चा विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून हरवला आहे. अशी माहिती पाटस पोलिसांनी दिली.
गौरव राकेश मांढरे (वय १९, रा. गिरीम मांढरेमळा ता. दौंड जि. पुणे) हा विद्यार्थी वरवंड येथील कै एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात बी.सी.एस चे शिक्षण घेत होता. तो शनिवारी (दि.२८) गिरीम येथुन घरुन महाविद्यालयात शाळेत आला होता. मात्र तो शाळा सुटल्या पासून घरी गेला नाही.
त्याची उंची चार फूट चार इंच, रंग सावळा चेहरा उभट, अंगाने मध्यम, केस बारीक काळे, अंगावर काळी रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट, पाठीवर काळी रंगाची शाळेची सॅक आहे. हा मुलगा कोणाला आढळून आल्यास किंवा या मुलाबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय देवकाते 9923695728, पोलीस शिपाई हनुमंत खटके मो नं 7620882424 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.