जालना – महान्यूज लाईव्ह
महान्यूज लाईव्ह चॅनेलवर ज्याच्या व्हिडीओने दर्शकांना भुरळ घातली आहे आणि सध्या सोशल मिडीयात ज्याच्या भाषणाची चर्चा होतेय, तो पठ्ठ्या जालना जिल्ह्यातील रेवलगाव (ता. अंबड) येथील असून तो खरोखरच खोडकर स्वभावाचा आहे.
घरची गरीबी आणि लहानपणीच आलेल्या रातांधळेपणाची कोणतीही सहानुभूती न घेणारा कार्तिक सध्या महाराष्ट्रातील चिमुकल्यांचा आणि पालकांचाही हिरो बनला आहे.
लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारे भाषण कार्तिकने केले. २६ जानेवारी रोजी त्याने हे भाषण करताना मग सर मला आतंकवादी ज्याप्रमाणे लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवतात, त्या प्रमाणे मलाही कधीकधी पायदळी तुडवतात असे वाक्य फेकून साऱ्या राज्यात धमाल उडवून दिली.
भाषणानं रातोरात हिरो बनलेल्या व ज्याच्या भाषणाने पोट धरून हसायला भाग पडत आहे, तो कार्तिक सध्या पहिलीत शिकतो. त्याला प्रजासत्ताकदिनी भाषण करायचं होतं. शिक्षकांनी त्याला भाषण दिलं.. आणि पठ्ठ्यानं असं ते पाठ केलंय की, साऱ्या महाराष्ट्राचा तो लाडका बनला आहे.