बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यभरातील शेकडो महत्वाच्या संस्थांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजीवन अध्यक्ष आहेत.. कुस्तीपासून ते शिक्षणापर्यंत व शेतीपासून ते उद्योगापर्यंत विविध संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शनही केले आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात शरद पवार यांच्यावर विरोधक असलेल्या भाजपच्या नेत्यांनी नास्तिकपणाचा आरोप केला होता..
त्यावर बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीरायाचे उदाहरण देत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला चोख उत्तर तर दिले, मात्र जोडीला दगडूशेठ गणपती मंदिरातील एक किस्सा जोडून पुन्हा भाजपने या विषयाला फोडणी दिली होती.
मात्र हे बऱ्याच जणांना माहिती नसेल की, शरद पवार यांचा श्रीगणेशाशीही निकटचा संबंध आहे. ते गणपतीचेही भक्त आहेत. एवढेच नाही, तर ते बारामती शहरातील एका गणेश तरुण मंडळाचे आजीवन सदस्यही आहेत.
बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरूण मंडळ हे ते गणेश मंडळ आहे. शरद पवार यांच्याशी या मंडळाच्या श्रीमंत आबा गणपती मुर्तीशी संबंधही तसाच भावनिक व श्रध्देचा आहे.
श्रीमंत आबा गणपतीची मूर्ती ही पुण्याचे मुर्तीकार एन. एन. वाघ यांनी घडवली आहे. त्यावेळी या मूर्तीची किंमत तीन हजार रुपये ठरविण्यात आली होती. मात्र मंडळाकडे त्यावेळी फक्त ३०० रुपये होते. ही माहिती शरद पवार यांना समजताच त्यांनी त्यांचे मित्र शरद वाडकर यांच्याकडे उर्वरित २७०० रुपये पाठवले आणि वाडकर यांनी ही रक्कम मंडळाकडे सपूर्द केली होती.
मंडळाचे त्या वेळेचे अध्यक्ष नंदलाल पालीवाल व सचिव प्रकाश पळसे यांनी मूर्तीचा करारनामा वाघ यांच्याशी केला होता, अन ही पूर्ण रक्कम शरद पवार यांनी दिलेली होती.
अर्थात मंडळाचे सगळे पदाधिकारीही गेली 5 दशके पवार कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. शरद पवार हे बारामतीतील एकमेव आखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अजिव सदस्य आहेत. आजही मंडळाच्या अडचणीला पवार साहेब आणि अजित पवार दोघेही धावून येतात. त्यांनाही मंडळा बाबत आस्था असल्याचे या मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
आता ही बाब आताच नजरेत येण्याचे कारण म्हणजे
नुकताच बारामतीत गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपतीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यानिमित्ताने जी गणपतीची मूळ मुर्ती आहे, ती मिरवणूकीसाठी ट्रॉलीचा वापर करून सातत्याने बाहेर काढावी लागत असल्याने यात मुर्तीची थोडी झीज झाली होती. या मुर्तीचा ५० वर्षानंतर जिर्णोध्दार करण्याचा संकल्प ममंडळाच्या वतीने ३ महिन्यांपूर्वी करण्यात आला.
या मुर्तीच्या जिर्णोध्दारासाठी सुनील लडकत, रमेश पंजाबी, प्रकाश पळसे, श्रीकांत जाधव, संजय गुळवे, बाळासाहेब सिकची, मोहन पंजाबी,अविनाश भापकर, राजेश जाधव, अरविंद लोंढे,निलेश गायकवाड,सचिन काळे, हनुमंत इंगळे, लल्लू ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमोल घोडनदीकर या पुणे येथील मुर्तीकाराने तिचा जीर्णोद्धार केला. दोन दिवसांपूर्वी गणेश जन्मोत्सवावेळी दुपारी 12 वाजता .पाळणा म्हणून गणरायाच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी 6.00 वा श्रीमंतांची आरती बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामतीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, विश्वास देवकाते पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, श्रीकांत सिकची, किरण इंगळे, नितीन डोळस, अमजद बागवान यांच्या हस्ते करण्यात आली.
हळदी कुंकू कार्यक्रम साठी ज्योती लडकत, अनिता गायकवाड, ज्योती इंगळे, सिमा चिंचकर,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन (मुन्ना) जाधव, निखिल लोंढे, प्रेमराज गायकवाड, योगेश चिंचकर, स्वप्निल भागवत, सुरेश लाखे, वैभव जगताप, कपिल सावंत, शांताराम बागल, संजय आहुजा,प्रशांत हंद्रे, अतुल भागवत, तेजस गायकवाड यांनी परिश्रम घेतले.