राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली भीमा नदीच्या घटनास्थळाची आज पाहणी केली. पहिल्या आणि दुसऱ्या पोस्ट मार्टमची करणार छाननी..आरोग्य खात्याकडून सविस्तर त्रुटींची उत्तरे घेणार अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
संपूर्ण राज्य हादरून सोडणाऱ्या दौंड तालुक्यातील पारगावच्या भीमा नदीत घडलेल्या सामूहिक सात जणांच्या हत्याकांडातील नदीपात्राची कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी (दि.२८) दुपारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असून पहिल्या आणि दुसऱ्या पोस्ट मार्टम रिपोर्ट यांची छाननी करण्यात येईल. आरोग्य खात्याकडून सविस्तर काही त्रुटीची उत्तरे घेण्यात येणार असून मेडिकल आणि फोरेन्सिक सायन्सच्या टीमची मदत घेत एकंदरीत घटनाक्रम आणि आरोपींचा त्यात असलेला रोल याची बारकाईने छाननी करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
दरम्यान यवत पोलिसांनी या घटनेतील पीकअप चौकशी करून तपास केला आणि हे पिकअप जप्त केले आहे.