सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याचा हवालदार मोहन ठोंबरे याला प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या बदल्यात दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काल संध्याकाळी पकडले.
इंदापूर तालुक्यातील कळस येथील एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी मोहन ठोंबरे यांनी लाच मागितली होती. दहा हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत मोहन ठोंबरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने अधिकाऱ्यांनी त्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना मोहन ठोंबरे याला पथकाने रंगेहात पकडले.
स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे पोट पुरेपूर भरेल एवढा पगार असतानाही पोलीस लाच मागतात, हे तर वर्षानुवर्ष सर्वांनाच माहिती आहे. परंतु लाच मागण्याची सुद्धा काही मर्यादा असावी, या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याने आता पोलीस ठाण्याची पायरी चढायला अनेकांची मन धजवत नाही.