पुणे – महान्यूज लाईव्ह
सहकारी बॅंकेच्या संचालकांनी १२४ कर्जांची प्रकरणे अशी सादर केली, जी बनावट होती. यात जवळपास ४३० कोटींची कर्जे नियमबाह्य पध्दतीने वितरीत केले गेले, सन २०२० मधील पिंपरी चिंचवडमधील एका बॅंकेचा हा घोटाळा ईडीच्या रडारवर आला आणि आज ईडीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली.
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याबाबतीत ही छापेमारी झाली आहे. त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी सध्या ईडीचे अधिकारी चौकशी करीत आहेत.
पिंपरी- चिंचवडमधील या सेवा विकास बॅंकेवर सध्या रिझर्व्ह बॅंकेने प्रशासकाची नियुक्ती केली असून या बॅंकेबाबत दोन वर्षापूर्वी म्हणजे सन २०२० मध्ये सहकार विभागाचे सहआयुक्त राजेश जाधवर यांनी कर्जवाटपाचे लेखापरीक्षण केले आणि त्यातून पात्रता नसतानाही कर्जदारांना अव्वाच्या सव्वा कर्जे दिली असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात अमर मूलचंदानी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामीनावर आहे.