सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे..पण या चित्रपटाची या भागात एकच चर्चा सुरू झाली आहे.त्याचे कारण ही तसेच आहे. पठाण चित्रपट पाहण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती येथील चाहत्यांनी अकलूज येथील श्रीराम सिनेमा हॉलची सर्व म्हणजे सहाशे तिकिटे बुक केली आहेत.
आज दुपारी ३.०० ते ६.०० चा शो पाहण्यासाठी बुक केला असल्याने पूर्ण माळशिरस तालुक्यासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. महिलांसाठी बाल्कनी मधील २०० तिकीट तर पुरुषांसाठी स्टाल मधील ४०० तिकिटे अशी एकूण १ लाख २० हजार रुपयांची तिकिटे पठाणवस्ती वरील चाहत्यांनी बुक केली.
या वस्तीवरील सर्व जाती-धर्माचे लोक असून सर्वजण शाहरुख खानचे चाहते असल्याने महिला व पुरुष सर्वजण पठाण चित्रपट पाहण्याचा आनंद घेणार आहेत. पठाणवस्ती येथील नागरिक पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी एकत्रपणे जात असताना रॅलीचे स्वरुप येणार आहे.