दिल्ली : महान्यूज लाईव्ह
बेशरम रंग या पठाण चित्रपटातील गाण्यानंतर पठाण या चित्रपटावरच बहिष्कार घाला असं सांगणारा एक वर्ग भारतात होता. त्यातही कडव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी हा विषारी प्रचार चालला होता. त्या विषारी प्रचाराला भारतीय रसिकांनी धोबीपछाड दिली. पठाण चित्रपटाने पहिल्या दोन-तीन दिवसातच 100 कोटींचा गल्ला केल्यानंतर भारतामध्ये एकतर्फी विषारी द्वेष चालत नाही असाच एक संदेश भारतातील रसिकांनी दिला आहे.
विशेषतः मुस्लिम अभिनेत्यांवर बहिष्कार घालण्यास सांगणारा आणि त्यासाठी प्रचार चालवणारा एक ट्रेंड सध्या सुरू आहे आणि त्याला हिंदीतवादी विचारसरणीचा राजकीय पक्षांचा अघोषित पाठिंबा आहे. पण या बहिष्काराची भाषा करणाऱ्या बायकॉट गॅंगला शाहरुख पठाण च्या चित्रपटाने चांगलाच धडा शिकवला आहे
सध्या ट्विटरवर बायकॉट गॅंग हा ट्रेड टॉप वर असून आमिर खान, शाहरुख खान सलमान खान यांच्यावर बहिष्कार घालण्याची भाषा केली जात होती त्याला नेटकऱ्यांनी जोरात उत्तर दिले आहे सोशल मीडियावर ही ट्विटरवर हा ट्रेड काल टॉप वर होता.