ओझर्डे गावचे तलाठी संदीप फाजगे यांना उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार प्रदान!

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीचे औचित्य साधून मतदार दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात उत्कृष्ट काम केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

वाई विधानसभा मतदारसंघ 256 मधील ओझर्डे ग्रामपंचायत अंतर्गत चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संदीप नारायण फाजगे तलाठी यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांनी घेऊन त्याचा प्रस्ताव सातारा जिल्हाधिकाऱ्यांना यांचे कडे पाठवला होता. त्या प्रस्तावाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व तलाठी संदीप फाजगे यांना उत्कृष्ट केंद्रस्तरीय मतदान अधिकारी म्हणून गौरव केला.

सदरचा पुरस्कार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते देण्यात आला. ओझर्डे गावचे कर्तव्यदक्ष गाव कामगार तलाठी संदीप फाजगे यांनी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले व निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती आशा दुधे, ओझर्डे गावचे मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी सुस्थितीत व अद्ययावत करण्याचे काम केले होते. जिल्हास्तरावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago