बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत हर्षवर्धन पाटील यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट…!! लवकरच सुरू सीतारामन यांचा दौरा होणार..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्याचे माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्ली येथे परवा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने केलेल्या तयारीचीही चर्चा झाली आहे.
आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा असा निर्धार भाजपा ने केला आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रातील मंत्र्यांची नेमणूक या मतदारसंघात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काही महिन्यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरा झाला होता. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह यांचाही दौरा झाला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील बऱ्याच अडचणींचा आढावा घेण्यात आला होता. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काही संस्थांना थेट आदेश दिला होता. त्याच अनुषंगाने राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे.
या भेटीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील असलेल्या अडचणी आणि संभाव्य परिस्थिती याबाबत सखोल अशी चर्चा झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने केलेल्या तयारीसह आगामी काळात कशा पद्धतीने नियोजन करावे लागेल. भाजपची ताकद अधिक भक्कम कशी होईल याबाबतही चर्चा झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर…!!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही दिवसांत पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती येणार आहेत. या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.