दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी अभेपुरी वडाचीवाडी भागात सव्वा दोन कोटींचा विकास निधी दिला. या विकास निधीतून करावयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.
गावात होत असलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी मकरंद पाटील व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ढोल लेझीमच्या साथीत उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव पवार उपस्थित होते.
किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे , महादेव म्हस्कर, शशिकांत पवार, भैय्यासाहेब डोंगरे, रमेश गायकवाड, शंकर शिंदे, राजेश शिंदे, बाबू शिर्के, रघुनाथ मालुसरे, महेंद्र पुजारी, किसनराव वाडकर, रवींद्र मांढरे, मयूर चव्हाण, नाना चिकणे ,राजेंद्र सोनवणे, दत्ता भणगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, अक्षय निंबाळकर, स्वप्निल पाचपुते, भरत देवराशे, सुनील फणसे , भगवान मांढरे, संजू मांढरे, सुरेश हगवणे, मदन पोळ, दामोदर फणसे, रामभाऊ पोळ, सूनिताताई कांबळे, विद्याताई पवार, धनश्री पार्टे, प्रतिभा मांढरे, सुजाता मांढरे यांच्यासह इतर विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते .