करमाळा: महान्यूज लाईव्ह
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे आणि ऊसतोड मजुरांच्या बाबतीत अनेक घटना घडताना दिसत आहेत. करमाळा तालुक्यात अशीच घटना घडली असून, आज ऊसतोड मजुराच्या दोन लहान मुलांचा एका खड्ड्यांमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला.
हिंगोली जिल्ह्यातील ऊस तोडणीसाठी आलेल्या श्रावण चव्हाण या मजुराची तेरा वर्षाची मुलगी प्रतीक्षा व नऊ वर्षाचा मुलगा पृथ्वीराज हे दोघेजण छोट्या खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना करमाळा तालुक्यातील पांगरी येथे घडली. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याने त्याच्या जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा एक खड्डा खोदला होता. खेळण्यासाठी प्रतीक्षा आणि पृथ्वीराज हे त्या पाण्यात उतरले आणि दुर्दैवाने त्यांना पोहता येत नसल्याने खड्ड्यात घसरून दोघेही बुडाले. उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.