किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर येथील श्री छत्रपती हायस्कूल सणसर या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात इंदापूरचे आमदार,माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरत उपस्थित विद्यार्थी व पालकांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार भरणे यांच्या हस्ते होते. मात्र कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याने नियोजित वेळेत कार्यक्रम सुरू करण्यात आला. भरणे उशिरा या स्नेहसंमेलनास उपस्थित राहिले, त्यावेळी मला आमदार झाल्यासारखं वाटतय या गाण्यावर विद्यार्थी नाचत होते.
मग भरणे येताच विद्यार्थ्यांनी त्यांना स्टेजवर बोलावले. भरणे यांनीही विद्यार्थ्यांबरोबर या गाण्यावर ठेका धरत विद्यार्थ्यांचे मन राखले. या कार्यक्रमात अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला अभिनय करत उपस्थितांची मनी जिंकली.
या कार्यक्रमासाठी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, अँड रणजीत निंबाळकर, डॉ दीपक निंबाळकर, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, उपसरपंच दीपक चव्हाण,छत्रपती हायस्कूलचे प्राचार्य रमेश मचाले, लक्ष्मण गिरीगोसावी, सुनील सर्जे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा खताळ यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात जान्हवी सरोदे (इ. सहावी) तनुश्री माहामुलकर (इ. दहावी), दिग्विजय दीपक चव्हाण (इ. नववी) या विद्यार्थ्यांसह,अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमास तुफान गर्दी
सणसर मध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व स्नेहसंमेलनाचा गर्दीचा विक्रम या कार्यक्रमाने मौडला. खुद्द भरणे यांनीही याविषयी आपल्या भाषणात कौतुक केले. पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी सणसर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी विशेष सहकार्य केले.