मुंबई : महान्यूज लाईव्ह
तुमच्या वाहनाला वरच्या बाजूला सनरूफ आहे? तुमच्या लहान मुलांना सनरूफ वर उभे राहायला आवडते? तर एक धक्कादायक बातमी! काळजीची बातमी तुमच्यासाठी! सनरूफमध्ये उभे राहून प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या एकाचा मांजाच्या दोरीने गळा कापून मृत्यू झाला आहे.
दुर्दैवी घटना पालघर मध्ये घडली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतच या प्रवाशाचा मृत्यू झाला.
मुंबईतील कांदिवली येथून पालघर मध्ये फिरण्यास आलेल्या दिशान तिवारी याचा यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. आजी आजोबासह पालघर जिल्ह्यातील हमरापुर येथे फिरण्यास आलेल्या दिशान याने कारच्या स्वरुप मधून पाहण्यास सुरुवात केली. तोच पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि कार वेगात असल्याने त्याचा गळा कापला गेला.
कार वेगात असल्याने त्याचा रक्तस्त्राव देखील जास्त झाला आणि रुग्णवाहिकेतून मुंबईला त्याला उपचारासाठी नेत असतानाच रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला.