सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – शहरातील नेताजी मित्र मंडळ व शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 127 वी जयंती काल (सोमवार) साजरी करण्यात आली.
इंदापूर शहरातील 40 फुटी रस्त्याच्या भागात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, प्रा. कृष्णा ताटे, वसंत माळूंजकर, गणपत पवार, डॉ. दत्तात्रेय कांबळे, शकिल मोमीन, मच्छिंद्र पवार, सोमनाथ गवळी, दिपक ताटे, गोरख पवार, शहबाज मोमीन, सागर पवार, वसिम बागवान, सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंतीचे आयोजन शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम पवार, गौरव राऊत, रियाज शेख, रोहन गाढवे, रोहित काळे, मोहिन मोमीन, शोएब मोमीन, प्रविण जाधव, आतिक मोमीन, शेखर पवार, जिशान शेख यांनी केले.