दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वेळे (ता.वाई) येथील खंबाटकी घाटातील तीव्र उतारावर दोन ट्रक एकमेकाला धडकल्या व दोन्ही मार्ग पुणे सातारा महामार्गावर पलटले. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करून ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी रमेश गर्जे यांनी दिली. दरम्यान ते तातडीने आपले सहकारी सहाय्यक फौजदार तोरडमल, इंगुलकर, देशमुख, आनंदा
भोसले यांना सोबत घेऊन घटनास्थळावर दाखल झाले व महामार्ग पोलिस ठाण्याचे फौजदार स्वप्नील पवार, विजय जाधव, के.डी.निंबाळकर, एन.बी.पवळे, संतोष लेंभे आदींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत केली.
महामार्गावर पलटी झालेले दोन मालट्रक वेळे ग्रामस्थ आणि क्रेनच्या सहाय्याने बाजुला काढेपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्या साठी वाहतूक वळवून ती खंबाटकी बोगद्याद्वारे बाहेर काढली .
भुईंज पोलिस आणी महामार्ग पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या या कार्यवाहीत वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले .
या अपघातात दोन्ही मालट्रकचे आर्थिक नुकसान झाले आहे.वाहतूक जलद सुरळीत केल्याबद्दल वाहन चालकांनी पोलिसांचे आभार मानले.